मुंबई: फडणवीस सरकारने महत्त्वाच्या कामांबाबत घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेऊन यापैकी काही वादग्रस्त निर्णयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे.
तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी निवडणुकीआधी ग्रामविकास विभागाअंतर्गत मंजूर २ ते २५ कोटीपर्यंतच्या अनुदान असलेल्या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय ठाकरे यांनी गुरुवारी घेतला.
बुधवारी संध्याकाळी मात्र सरकारने एक शासनादेश जारी करून ग्रामविकास विभागाच्या योजनांना स्थगिती दिल्याचे जाहीर केले.
शासनादेशात म्हटले आहे की, लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणे (२५-१५, १२-३८), कोकण पर्यटन विकास कार्यक्रम २५-१५ २४-३२) यात्रास्थळाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम, ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता दोन कोटी ते २५ कोटीपर्यंत अनुदान योजनेअंतर्गत अद्याप कार्यारंभ आदेश देण्यात न आलेल्या विकासकामांना स्थगिती देण्यात आहे.
तसेच या कामांना कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाहीही पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगिती देण्यात येत आहे,’ असेही म्हटले आहे.