अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- त्याग केल्याशिवाय माणुस घडत नाही. व्यक्तीच्या त्यागावर त्याच्या उज्वल भवितव्याचा पाया रचला जात असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
निमगाव वाघा येथे आयोजित कवी संमेलन, महिला बचत गट मेळाव्याचे उद्घाटन तसेच विविध पुरस्कार व शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळ्यात आ.लंके बोलत होते.
यावेळी माधवराव लामखडे म्हणाले की, नाना डोंगरे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणावर वर्षभर कार्य करत आहे.
सामाजिक भान जपर्णाया नेत्यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान होणे ही गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तर दिवाळीनंतर निमगाव वाघात मोठा कुस्तीचा आखाडा घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे यांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळण्यासाठी व व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या युवकांना रोखण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
तसेच सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देण्यात आले असल्याचे सांगितले.आमदार लंके यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींना स्वामी विवेकानंद युवा गौरव व राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरविण्यात आले.
मोहनीराज गटणे यांनी विद्यार्थ्यांनी आवड असलेल्या क्षेत्राच्या स्पर्धेत उतरावे व आत्मविश्वासाने त्यामध्ये पारंगत व्हावे. आपल्यातील गुणांचे दिखाव्याचे प्रदर्शन करण्यापेक्षा आहे त्या क्षमेतेचे दर्शन घडविण्याचे आवाहन केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम