अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- अल्पवयीन मुलास अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना बेलापूर रोड वरील गायकवाड वस्ती येथे घडली आहे. दरम्यान याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलापूर रोड गायकवाडवस्ती येथे राहणार्या अल्पवयीन मुलाची आई वैशाली सचिन करपे ह्या न्यायालयीन कामकाजासाठी औरंगाबाद येथे गेल्या होत्या.
घरी वैशाली यांच्या आई तसेच दोन मुले होती. संबंधित मुलाची आई घरी परतली असता आपला मुलगा राज उर्फ लकी (वय 11) हा दुपारी जेवण करून बाहेर गेला तो परत आला नाही.
त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही. मुलगा राज उर्फ लकी यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे, असे वैशाली करपे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात वैशाली सचिन करपे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम