…तर मढी गावासह कानिफनाथ मंदिर बंद करण्यात येईल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. यातच सण उत्सव आले असल्याने नागरिकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणून प्रशासनाने आक्रमक पाऊले उचलली आहे.

यातच आजपासून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे खुली होणार आहे. या अनुषंगाने प्रशासनाने नियमावली ठरून दिली आहे. याचे उल्लंघन झाले तर कारवाई केली जाणार आहे असे देखील प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे.

मंदिर उघडण्याबाबत शासनाच्या आदेशाचे पालन करताना मढी व वृध्देश्वर देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाने सर्व नियमांचे पालन न केल्यास विश्वस्त मंडळाविरुध्द कारवाई करण्यात येईल व आगामी काळात मढी येथे दहा पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास मढी गावासह कानिफनाथ मंदिर बंद करण्यात येईल.

असा इशारा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी दिला. मढी येथे चैतन्य कानिफनाथाची संजीवन समाधी असून शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मोहटादेवी येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी मढी मायंबा वृद्धेश्वर या ठिकाणी येते.

असा दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाने मढी व वृद्धेश्वर देवस्थान समिती मंडळाची बैठक घेऊन शासकीय नियमांची कल्पना देत विविध मार्गदर्शक सूचना केल्या.

या नियमांचे पालन करणे बंधनकारक मंदिरामध्ये हार पुजेचे कोणतेही साहित्य घेऊन जाऊ नये 10 वर्षांखालील तसेच 65 वर्षावरील व्यक्ती, गर्भवती महिला,

आजारी व्यक्ती यांना प्रवेशबंदी रेड झोन,कन्टेन्मेंट झोन मधील व होम क्वारंटाईन असलेल्या भक्तांना मंदिरात बंदी मंदिर परिसरातील व्यावसायिकांना करोना चाचणी बंधनकारक लसीचे दोन डोस घेतलेल्याना दुकान उघडता येणार