अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

राहुरी  – नगर – मनमाड रस्त्यावर डिग्रस शिवारात मुळा उजव्या कालव्याजवळ भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक देवून उडविले. 

ही धडक इतकी जोराची होती की, दुचाकीवरील तरुण राजू संजय पवार, वय ३०, रा. धामोरी बु., ता. राहुरी हा तरुण जागीच ठार झाला. काल ६:४५ वाजता हा भीषण अपघात झाला.
अपघात करुन चालक गाडीसह फरार झाला. याप्रकरणी मयताचे भाऊ सोमनाथ दिनकर पवार यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन अज्ञात गाडीचालक आरोपीविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment