श्रीगोंदा – शेतातील विहिरीत नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे अर्भक अज्ञात स्त्रीने बाळंत होवून ते लपविण्याच्या उद्देशाने फेकले असावे असा संशय पोलीसांनी व गावकर्यांनी आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील शेती गट नं. ३५९ मधील रोहिदास टकले यांच्या शेतातील विहिरीत नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे अर्भक विहिरीत मृतावस्थेत मिळून आले आहे.
याप्रकरणी याप्रकरणी हे.कॉ. रोहिदास झुंजार यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात स्री व पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.