अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून आयकर विभाग तसेच इडी यांच्याकडून राज्यातील काही प्रमुख नेतेमंडळीच्या मालमत्तेवर छापा सत्र सुरु आहे.
यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही नातेवाईकांवर आयकर विभागाने छापा मारला आहे. राज्यात हे प्रकरण चर्चेत असताना याप्रकरणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अत्यंत महत्वपूर्ण विधान केले आहे.
राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर केलेली प्राप्ती कर खात्याची कारवाई ही आकस बुद्धीने नसून, या कारवाईचा केंद्राशी कोणताही दुरान्वये संबंध नाही असा निर्वाळा केंद्राचे सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिला.
दरम्यान मंत्री आठवले हे अकोले तालुक्याच्या बरोबरच जिल्ह्याच्या दौऱ्याला आले होते. त्याची सुरुवात त्यांनी राजूर पासून केली. तेथे ते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना भेट दिली.
त्यांनी अकोले येथे पत्रकारांशी परिसंवाद संवाद साधला. तेव्हा त्यांनी अजित पवार यांच्या नातेवाईकांवर प्राप्तिकर खात्याची कारवाई बुद्धीची नसल्याची भूमिका मांडली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम