जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग; शहरातील रस्त्यांना आले नदीचे स्वरूप

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या दिवसांपासून वेगवेगळ्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यातील पावसाची सरासरी १३९ टक्के झाली असून आतापर्यंत ६५०.३ सरासरी मिलीमीटर पाऊस झालेला आहे.

दरम्यान, शनिवारी जिल्ह्यात अन्य भागासह नगर शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. तासभर वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडात पाऊस झाला.

या पावसाने शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. तासभर चाललेल्या पावसामुळे नगर शहरातील सखल भागात पाणी साचले तर अनेक गल्ली आणि रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते.

पावसाचे हे पाणी चारी छोटी वाहने, रिक्षामध्ये शिरले. पावसाने नागरिकांची तारंबळ उडाली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील या पावसाने हजेरी लावली.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठावर राहणाऱ्या गावांना सर्तकेतचा इशारा दिला असून पूरातून वाहने न चालविण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.

बळीराजाच्या चिंतेत भर :- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साठून तळे बनले आहे. अनेक ठिकाणी चारा पिके, सोयाबिन हे पाण्यात गेली आहे. दुसरीकडे हेक्टरी हजारो रुपये खर्च करून केलेली कांदा लागडीचे काय होणार याची शेतकऱ्यांना काळजी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe