सुदैवाने रस्ता होता सुनसान नाहीतर घडले असते असे काही….

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑक्टोबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील निमोण येथील ओढ्यातील डांबरी रस्त्यावर मोठा वटवृक्ष कोसळला. सुदैवाने वटवृक्ष रस्त्यावर कोसळला त्याचवेळी दुचाकी, चारचाकी वाहन अथवा कुणी या रस्त्यावरून प्रवास करीत नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील निमोण येथे ओढ्यातील डांबरी रस्त्याच्याकडेला मोठे वटवृक्ष आहेत. त्यातील एका वटवृक्ष अखेर रविवारी दुपारी डांबरी रस्त्यावर कोसळला.

मात्र त्याचवेळी दुचाकी, चारचाकी वाहन अथवा कुणी या रस्त्यावरून प्रवास करीत नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. वटवृक्ष रस्त्यावर कोसळल्याचे समजताच अनेक ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली.

दरम्यान या दुर्घटनेमुळे लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. अखेर तो महाकाय वटवृक्ष रत्याच्या बाजूला घेण्याचे काम सुरु करण्यात आले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe