अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- हिवाळ्यात मिळणारी गोड द्राक्ष एक असं फळ आहे, जे सामान्यतः सगळ्यांना आवडतं. द्राक्षाच्या दाण्या मध्ये ना बी असते, ना साल. थोडंसं दाबल्यानंतर ती तोंडात विरघळतात. द्राक्षात अनेक पोषक, अँटी ऑक्सिडंट, अँटी बॅक्टेरिअल गुण असतात.
» कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून राहते : – द्राक्षाच्या सालीच्या बाह्य थरात रेस्वेराट्रॉल अँटीऑक्सिडंट आणि क्करसिटीन अँटी इन्फ्लेमेटरी घटक असतो, ज्यामध्ये कर्करोगविरोधी गूण असतात. हे घटक प्रोस्टेट, ब्रेस्ट, फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या पेशी वाढविणे रोखतात. रेस्वेराट्रॉल सूर्याच्या यूवीबी हानिकारक किरणांमुळे होणाऱ्या त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी करते.
» मधुमेहात फायदेशीर : – द्राक्षात असणारे हैरोस्टिलवेन नावाचं अँटीऑक्सिडंट रक्तातील शर्करेची पातळी कमी करते. आठवड्यातून २-३ वेळा वेगवेगळ्या रंगाची द्राक्ष वाटीभर खाण्याने टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता सत्तर टक्क्यांनी कमी होते.
» हृदयरोगाला दूर ठेवते : – द्राक्षामध्ये असणारे क्युरेटिन अँटी इन्फ्लेमेटरी फ्लेवोनॉयड, पॉलिफिनॉल यासारखे घटक लिपोप्रोटिन म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल नियंत्रित ठेवतात. ओरोस्टिलवेन अँटीऑक्सिडंट काळ्या द्राक्षात आढळते.
याचा ज्यूस पिण्याने रक्तातील नायट्रिक ऍसिड पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. ज्यामुळे ब्लड क्लॉटिंग होत नाही. काळ्या द्राक्षांचा रस हृदयरोगालादूर ठेवण्यासाठी देण्यात येणाऱ्या अँस्पिरिनच्या गोळी समान काम करतो.
» अनिमिया टूर ठेवते : – लोह घटकाने समृद्ध द्वाक्षांच नियमित सेवन करण्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. नियमितपणे एक छोटी वाटी द्राक्ष किंवा द्राक्षाचा एक ग्लास ज्यूस पिण्याने थकवा आणि अशक्तपणा दूर् होतो. एक कप ज्यूस मध्ये दोन चमचे मध मिसळून पिल्याने अॅनिमिया पीडित व्यक्तीला लाभ होतो.
» पोट भरल्याची जाणीव : – द्राक्ष हे एक आदर्श फळ आहे. यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक आणि फॅट्स नाही. म्हणून एक वाटी द्राक्षं खाल्ल्यानंतर खूप वेळ पोट भरल्यासारखे वाटते.
» एनर्जी बूस्टर : – द्राक्ष्यांमधे असणारे फ्रुक्टोज आणि ग्लुकोज रक्तात सहज शोषले जाते. यामुळे त्वरीत थकवा नाहिसा करून शरीराला ऊर्जा प्रदान करते.
» अपचनाची समस्या दूर : – फायबर्स आणि ग्लुकोज भरपूर प्रमाणात असल्यामुळे द्राक्षाच्या सेवनाने पचन यंत्रणा मजबूत होते. यामध्ये असणारे ऑर्गेनिक अँसिड, सेल्युलोज आणि पॉलीओज घटक पोटाचं टोनिंग करून अपचन, गॅसेस, पोटात जळजळ किंवा सूज,
उलटी होणे किंवा मळमळणे यासारख्या समस्या दूर करण्यास सहाय्यक ठरतात. द्राक्षाच्या रसात चिमूटभर मीठ आणि काळे मिरे मिसळून पिल्याने आराम मिळतो.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम