तहसीलदार चढले टेम्पोत.. काय आहे प्रकार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :-  आपल्या कामाने नेहमी सर्वसामान्य माणसांच्या गळ्यातील ताईत बनलेले राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांनी आज अचानक अशी एक तपासणी केली आहे.

त्याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. मोफत धान्य वितरण व्यवस्थेमार्फत मिळणारे धान्य लाभार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचते की नाही याची शहानिशा करण्यासाठी राहुरीचे तहसीलदार

फसीयोद्दीन शेख यांनी तालुक्यातील पूर्व भागात दौऱ्यावर असताना अचानक टेम्पो थांबवून त्या टेम्पोत चढून धान्याची पोती मोजून घेत शहानिशा केली.

तालुक्याचा मोठा कारभार पहात असताना छोटा घटक दुर्लक्षित राहणार नाही यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे तहसिलदार शेख यांच्या कार्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News