अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 : एकीकडे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे अक्षरश कंबरडे मोडले आहे. मात्र नुकतेच केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना महागाईच्या भडक्यातून काहीसा दिलासा मिळाला आहे.
सणासुदीच्या काळात स्वयंपाकाच्या तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलांवरील सीमाशुल्क कमी केलं आहे. यामुळे तेलाचे दर स्वस्त होणार आहे.
सरकारनं पाम तेल आणि सनफ्लावर तेलावरील अग्री सेस आणि सानुकूल शुल्क कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याआधी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं तेल आणि तेलबियांच्या साठेबाजीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक नियम जारी केले होते.
स्टॉक लिमिट ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू राहणार आहे. केंद्राकडून राज्य सरकारांना आदेशांची कडक अंमलबजावणी होईल याची काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
केंद्राच्या माहितीनुसार मोहरीचं तेल वगळता इतर खाद्य तेलाच्या किरकोळ किमतीत ३.२८ टक्के ते ८.५८ टक्क्यांपर्यंत घट केली आहे. केंद्राकडून खाद्यतेलावरील करात घट केलेली असली तरी अद्याप बाजारात खाद्यतेलाच्या दरात हवी तशी घट झालेली पाहायला मिळालेली नाही.
सरकारनं जाहीर केलेल्या या कपातीनंतर सोयाबीन आणि सुर्यफूल तेलावरील सीमाशुल्क अनुक्रमे ८.२५ टक्के, ५.५ टक्के आणि ५.५ टक्के इतकं असणार आहे. याशिवाय सुर्यफूल, सोयाबीन, पामोलिन आणि पाम तेलावरील मूळ सीमा शुल्क ३२.५ टक्क्यांवरुन १७.५ टक्के इतकं करण्यात आलं आहे.
देशांतर्गत बाजारात किरकोळ किंमती वाढल्याने आणि सणासुदीच्या काळात सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केले आहे.
सरकारने मार्च २०२२ पर्यंत पाम, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या कच्च्या वाणांवरी कृषी उपकर कमी केलाय. यामुळे सणासुदीच्या काळात तेलांचे दर कमी व्हावेत यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम