आमदार निलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र ! म्हणाले…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- परतीच्या मोसमी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत.

शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

आमदार लंके यांनी गुरेवाडी, ढवळपुरी, वाघवाडी परिसरातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी संजीव भोर, आत्मा समितीचे अध्यक्ष राहुल झावरे, बापूसाहेब शिर्के आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.

कांदा रोपे, सोयाबीन शेतातच सडले आहे.उस,मका भूईसपाट झाले आहेत. फळबागांचे विशेषतः डाळींब बागांचे अतोनात नुकसान झाले आहे.

कोरोना संसर्ग काळात मागणीत कमालीची घट झाल्याने शेतीमालाला उत्पादनखर्च वसूल होण्याइतपतही भाव मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.त्यांना तातडीने आधार देण्याची गरज आहे.त्यामुळे पंचनाम्याचे सोपस्कार तातडीने पार पाडून योग्य ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.

शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. ढवळपुरी, वाघवाडी, येथील नुकसानीची पाहणी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe