अहमदनगर बार असोसिएशन निवडणुकीसाठी ‘या’ दिवशी मतदान होणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर बार असोसिएशन या संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एकूण १३ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबर रोजी मतदार होणार आहे.

मतदानानंतर लगेच मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान मागील वर्षी करोनाछाया वाढत्या प्रादुर्भावामुळे बार असोसिएशनची निवडणूक घेण्यात आली नव्हती.

आता निवडणूक घेण्यास वरिष्ठ न्यायालयाने परवानगी दिली असून, निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. अशोक गुंड पाटील यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.

असा असणार आहे निवडणूक कार्यक्रम…
२० ते २२ ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्जाची विक्री आणि स्वीकृती केली जाणार
२२ ऑक्टोबर रोजी दाखल उमेदवारी अर्जाची छाननी करून यादी प्रसिद्ध करणे
२१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज माघारीची मुदत
२३ ऑक्टोबरला पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार
२९ ऑक्टोबर रोजी मतदार होणार असून, त्याच दिवशी निकाल घोषित केला जाणार

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe