अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४२ हजार ४८७ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ४३९ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ८५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १३९ आणि अँटीजेन चाचणीत ३४ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, अकोले ०७, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०१, पारनेर २२, पाथर्डी ०१, राहुरी १४, संगमनेर ३५ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५, जामखेड ०२, कर्जत ०९, कोपरगाव १०, नगर ग्रा. ०६, नेवासा ०५, पारनेर १४, पाथर्डी ०२, राहता ३१, राहुरी ०५, संगमनेर ०४, शेवगाव ०६, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ०५ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ३४ जण बाधित आढळुन आले. अकोले ०८, जामखेड ०१, कर्जत ०२, कोपरगाव ०२, नगर ग्रा. ०१, नेवासा ०२, पारनेर ०१, राहता ०१, राहुरी ०३, संगमनेर १० आणि श्रीगोंदा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २५, अकोले २४, जामखेड ०६, कर्जत ३७, कोपरगाव १२, नगर ग्रा. ३२, नेवासा १२, पारनेर ३५, पाथर्डी ११, राहाता २८, राहुरी १७, संगमनेर ७२, शेवगाव १०, श्रीगोंदा ४३, श्रीरामपूर ०८ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:३,४२,४८७
उपचार सुरू असलेले रूग्ण:२४३९
पोर्टलवरील मृत्यू नोंद:६९६६
एकूण रूग्ण संख्या:३,५१,८९२
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम