अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- देशातील मोदी सरकार आता सर्व बेरोजगारांना दरमहा साडे तीन हजार रुपये देणार असल्याचा संदेश तुम्हालाही आला असेल तर थांबा.ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे नक्की वाचा कारण सत्य जाणून घेण्याची गरज आहे.
अशा पद्धतीची खोटी माहिती देऊन तुमच्यासोबत कुणीही फ्रॉड करण्याची शक्यता आहे. मोदी सरकार बेरोजगारांना ३,५०० रुपयांची दरमहा मदत करणार असल्याचा मेसेज प्रचंड व्हायरल झाला आहे.
मात्र आता PIB च्या Fact Checkनं यामागचं सत्य सर्वांसमोर आणलं आहे. (truth that the Modi government will now give Rs 3,500)
वायरल मैसेज में दावा किया गया है कि भारत सरकार 'प्रधानमत्री बेरोजगार भत्ता योजना' के तहत सभी बेरोजगारों को ₹3500 प्रति माह दे रही है#PIBFactCheck
▶️ भारत सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है
▶️ किसी भी संदिग्ध लिंक पर क्लिक ना करें यह धोखाधड़ी का प्रयास हो सकता है pic.twitter.com/qwusnjkQF4— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 16, 2021
भारत सरकार पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना सुरू करणार असल्याचं असा दावा व्हायरल मेसेजमधून करण्यात आला होता. पण अशी कोणत्याही पद्धतीची योजना मोदी सरकारनं लागू केलेली नसल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे.
पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेसाठी प्री-रजिस्ट्रेशन सुरू झाल्याचाही मेसेज व्हायरल झाला आहे. यात बेरोजगार तरुणांना दरमहा ३,५०० रुपये आर्थिक मदत मिळविण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
यासाठी एका लिंकवर क्लिक करुन आपली वैयक्तिक माहिती भरण्यास संबंधित व्हायरल मेसेजमध्ये सांगितलं गेलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम