‘त्या’ मुलांच्या शोधासाठी पोलिसांचे ऑपरेशन मुस्कान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : विशेष पोलिस महानिरीक्षक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र, मुंबई यांनी ऑपरेशन मुस्कान दि.२८ नोव्हेंबर रोजी हरविलेल्या बालकाच्या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार ऑपरेशन मुस्कान-७ ही शोधमोहिम दि.१ ते ३१ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र राज्यात दरवर्षी प्रमाणे राबविण्याचे आदेश पारीत केले आहे.

त्यानुसार जिल्ह्यात मुस्कान-७ शोधमोहिम दि.१ पासुन सुरू केली असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, अ.नगरचे पोलिस निरीक्षक वसंत पथवे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

हरवलेल्या बालकांच्या संबंधात ऑपरेशन मुस्कान ७ ही शोध मोहिम नगर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.

त्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना हरविलेल्या बालकांच्या शोध मोहिम करीता १ डिसेंबर पासुन मोहिम सुरू करण्याचे कळविले.

त्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे, अशी माहिती पो.नि. पथवे यांनी दिली. त्यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या परिसरात आजुबाजुस, रेल्वे स्टेशन, बसस्थानके, रस्त्यावर भिक मागणारी मुले

अथवा कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रूग्णालये, हॉटेल्स, दुकाने इ. ठिकाणी काम करीत असणारी मुले अशा मुलांना हरवलेली मुले समजुन आढळुन आल्यास जवळच्या पोलिस ठाण्याला त्याबाबत तात्काळ माहिती द्यावी, जेणेकरून एखाद्या कुटुंबातील हरवलेल्या बालकाचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे दु:ख दुर करण्यास मदत होईल.

तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment