अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- बीड जिल्ह्यातील पोखरी शिवारात सोमवारी आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. तो मृतदेह अहमदनगर येथील शेखर उर्फ रमेश पुजारी याचा आहे.
त्याच्या मृत्यूचे सत्य हे शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येणार असून पुढील तपास सुरु आहे. नगर-कडा- जामखेड- बीड राष्ट्रीय महामार्गावरील पोखरी शिवारात सोमवारी सकाळी जीन्स,
पांढरा शर्ट, डाव्या कानाला जुनी जखम असलेला ३५ वर्षीय अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पोलिस निरीक्षक सलिम चाऊस,
पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी नागरिकांना अधिक माहिती देण्याचे आवाहन केले होते.
आज त्याची ओळख पटली आहे. शेखर उर्फ रमेश पुजारी असे मृताचे नाव आहे.
तो अहमदनगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.दरम्यान, मृतदेह अंबाजोगाई येथील रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम