अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- आईला शिविगाळ करून मारहाण करणा ऱ्या बापाला मुलाने लाकडी दांडकने केलेल्या बेदम मारहाणीत बापाच मृत्यू झाला.
शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजणच सुमारास ही घटना घडली. सरपणावर पडून वडीलांचा मृत्यू झाल्याचा बनाव मुलगा राहूल झावरे याने केला होता.
मात्र पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांना संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी केली असता माररहाणीत वडीलांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.
त्यानंतर आईच्या फिर्यादीवरून मुलाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करणत आला. पारनेर पोलिसांनी राहुल यास अटक केली आहे.
यासंदर्भात पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार बाळासाहेब झावरे वय ५० हे नेहमी दारू पिउन पत्नी मंदा यांना मारहाण करीत. शुक्रवारी रात्री दारू पिऊन येत त्यांनी मंदा यांना शिविगाळ करून बेदम मारहाण केली.
त्यानंतर पत्नीला घरात कोंडून घेत त दाराला कुलूप लाऊन घेतले होते. काही वेळानंतर त्यांचा राहुल हा देखील दारू पिऊन मित्रासोबत घरी आला.
घराला लावलेले कुलूप पाहून मुलगा व वडीलांमध्ये वाद झाला. त्यानंतर वडीलांनी कूलूप उघडून सर्वांनी घरात प्रवेश केला.
घरात गेल्यानंतर वडीलांनी पाण्याच्या बाटलीमध्ये भरून ठेवलेल्या दारूची पत्नी मंदा यांच्याकडे मागणी केली. ती देण्यास मंदा यांनी नकार दिला.
त्यावेळीही त्यांनी शिविगाळ करून पत्नीला मारहाण केली. वडीलांच्या जाचामुळे मुलगा राहूल यांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष होता. आईनेे स्वयंपाक करून सर्वाजणांनी जेवण केले. तनंतर वडील घरामागील शेताकडे निघून गेले.
आईला मारहाण होत असल्याने संतापलेल्या राहूलने पाठीमागून जात वडील बाळासाहेब झावरेे यांना लाकडी दांडकने बेदम मारहाण केली.
त्यात त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली. तसेच चेहावरही गंभीर इजा झाली होती. डोक्यास जबर मर लागल्यामुळे झावरे हे जमीनीवर कोसळले.
वडील गंभीर जखमी झाल्याचे लक्षात आलनंतर राहूल याने रूग्णवाहीका बोलवून त्यांना टाकळीढोकेश्वर येथील ग्रामीण रूग्णालात उपचारासाठी हालविले. मात्र उपचारापूर्वीच तंचे निधन झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घोषीत केले.
आपणाकडून वडीलांचा खून झालची जाणीव झाल्यानंतर राहूल याने चलाखी करीत टाकळी दुरक्षेत्रात जाऊन बनाव करण्याचा प्रयत्न केला. तसा जबाबही त्याने पोलिसांना लिहून दिला.
दि. २२ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास माझे व वडीलांचे दारू पिऊन आल्यामुळे वाद झाले. त्यानंतर घरामागील रस्त्याने वडील शेताकडे निघून गेले.
रात्री ११.३० च्या सुमारास आईसह वडीलांचा शोध घेणसाठी ते गेलेल्या रस्त्याच्या दिशने गेलो असता काही अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या सरपणात वडील पालथे पडलेल अवस्थेत आढळून आले.
आरडा ओरडा केलनंतर मित्र सागर भाउसाहेब देशमुख हा तेथे ऍम्ब्युलन्स घेऊन आला. त्यांनतर त्यांना टाकळीढोकेश्वर ग्रामीण रूग्णालात दाखल करणत आल्याचा राहूलने जबाब लिहून दिला होता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम