अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- पारनेर तालुक्यासह आ. लंके समर्थकांना उत्सुकता लागून राहिलेल्या आ. लंके यांच्यावरील चित्रपटाच्या नावाची अखेर घोषणा झाली आहे.
पिंपळनेर येथे आ. लंके यांच्या उपस्थितीत ‘आखाडा’ हे या चित्रपटाचे नाव असणार असल्याची घोषणा करण्यात आली.
लोकवर्गणी करून तब्बल ६० हजारांच्या मताधिक्क्याने विधानसभेत पोहचलेल्या आमदार नीलेश लंके यांच्या जिवनावर आता चित्रपट प्रदर्शीत होणार आहे.
चित्रपट निर्मात्याने आ. लंके यांच्या जिवनावर ९०० पानांची स्टोरी तयार केली असून आ. लंके यांचा इयत्ता पाचवीपासून शरद पवार आरोग्य मंदीरापर्यंतचा प्रवास या चित्रपटामध्ये चित्रीत करण्यात येणार आहे.
रविवारी २४ ऑक्टोबर रोजी पिंपळनेर येथे या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. आ. नीलेश लंके, त्यांच्या पत्नी जि. प. सदस्या राणी लंके यांच्या उपस्थितीत या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात अली.
आ. लंके यांची भुमिका साकार करण्यासाठी आ. लंके यांच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेल्या अभिनेत्याचाही शोध घेण्यात आला आहे.
मराठी व हिंदी भाषांमध्ये हा चित्रपट चित्रित करण्यात असुन एकाच वेळी १ हजार चित्रपटगृहांमध्ये तो प्रदर्शित करण्याची योजना आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम