चाकूचा धाक दाखवून वृद्धाला गाडीत बसविले अन पुढे नेऊन त्याच्या सोबत केले असे काही

Ahilyanagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरातील माळीवाडा बस स्थानक परिसरात एका वृद्धाला प्रवाशी बनवून घेऊ जाणाऱ्या एका वाहनचालकाने एका वृद्धाला लुटल्याची घटना नुकतीच घडली आहे.

या टोळीने पाथर्डी ला जाण्यासाठी निघालेल्या एका वृद्धाला चाकूचा धाक दाखवत गुंगी चा स्प्रे फवारून एकवीस हजार रुपये लुटले होते.

नामदेव विठ्ठल पाखरे वय 60 राहणार वडुले तालुका शेवगाव असे लुट झालेल्या इसमाचे नाव आहे त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पाखरे माळीवाडा बस स्थानकाच्या बाहेर उभे असताना पाथर्डी कडे जाण्यासाठी उभी असलेल्या एका कारमधून आलेल्या चौघांनी त्यांना कुठे जायचे आहे .

अशी विचारणा केली पाखरे यांनी पाथर्डी ला जायचे असे सांगितले. तुम्हाला पाथर्डीला सोडतो असे म्हणत त्यांनी पाखरे यांना कारमध्ये बसवले पुढे गेल्यावर त्यांना चाकूचा धाक दाखवून गुंगीच फवारणी केली त्यांच्या खिशातील 21 हजार रुपयाची रक्कम काढून घेत चोरटे फरार झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe