अहमदनगर ब्रेकिंग : सासरवाडीत मारहाण; जावयाने केली आत्महत्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- पत्नीला आणण्यासाठी सासूरवाडीला गेलेल्या जावयास शिवीगाळ व मारहाण झाल्याने जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी मृताच्या नातेवाईकाने दिलेल्या फिर्यादीवरून सासरकडच्या पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील मृत अनिल बाळासाहेब धाकतोडे (२३, रा. गंगापूर,ता. राहुरी) यांची पत्नी लोणी येथे माहेरी गेली होती.

पत्नीला आणण्यासाठी अनिल हा सासरवाडीला गेला असता सासरच्या मंडळीने शिवीगाळ व मारहाण केली.अनिल हा माघारी आल्यानंतर त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुनिता बाळासाहेब धाकतोडे यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिल्याने सासरकडील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सासरच्या पाच लोकांना अटक करण्यात आली आहे.