तुम्हाला माहित आहे का की उत्तीर्ण होण्यासाठी किमान 33% का आवश्यक असतात? वाचा यामागील महत्वाचे कारण

Ahmednagarlive24 office
Published:

नुकतेच दहावी आणि बारावीची परीक्षा संपल्या असून आता काही दिवसात निकाल देखील जाहीर होणार आहे. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षण मंडळाकडून काही निकष लागू केलेले असतात व त्यानुसार विद्यार्थी उत्तीर्ण आहे की अनुत्तीर्ण ते ठरवले जाते. तसे पाहिले तर भारतामध्ये राज्यानुसार उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेली टक्केवारी ही वेगवेगळी आहे.

परंतु महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्याला जर उत्तीर्ण व्हायचे असेल तर त्याला प्रत्येक विषयात किमान 33 टक्के गुण असणे गरजेचे आहे व अशाप्रकारे 33% गुण मिळाले तरच तो विद्यार्थी उत्तीर्ण आहे असे घोषित केले जाते. परंतु आपण कधी हा विचार करतो का की विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 33% गुण का मिळवावे लागतात? यापेक्षा कमी किंवा जास्त का नाही? त्याबद्दलचीच माहिती या लेखात बघू.

विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 33% गुण देशातील कोणत्या राज्यात लागू आहेत?
जर आपण देशातील पंजाब, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड आणि सीबीएससी बोर्डाचा विचार केला तर या ठिकाणी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 33 टक्के गुण मिळणे गरजेचे आहे. परंतु या उलट जर आपण केरळ बोर्डाचा विचार केला तर त्या ठिकाणी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत 30 टक्के किमान गुणांची आवश्यकता असते.

याव्यतिरिक्त बांगलादेश आणि पाकिस्तान देशांमध्ये देखील किमान उत्तीर्ण गुण 33% इतकेच आहेत. तसेच जर्मनीचे उदाहरण बघितले तर त्या ठिकाणी जीपीएफ प्रणाली म्हणजेच एक ते सहा किंवा पाच पॉईंट स्केल वापरले जाते. या ठिकाणी एक किंवा दीड टक्के गुण खूप चांगले समजले जातात व 4.1 ते पाच टक्के गुण पुरेसे चांगले नाही असे मानले जाते व या पद्धतीने त्या ठिकाणी गुणांची गणना केली जाते.

तसेच चीनच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पाच किंवा चार स्केल ग्रेडिंग सिस्टम आहे. म्हणजेच चीनमध्ये गुणांवर आधारित ग्रेड दिली जाते. म्हणजे शून्य ते 59% ज्या विद्यार्थ्याला गुण मिळतील त्यांना एक ग्रेड दिली जाते. येथे ग्रेडची चार स्तरीय प्रणाली असून त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याला डी ग्रेड मिळते तो विद्यार्थी अनुत्तीर्ण समजला जातो.

उत्तीर्ण होण्यासाठी किमान 33% गुण आवश्यक व त्यामागील इतिहास
याबाबतीत इतिहास बघितला तर भारतामध्ये ही व्यवस्था ब्रिटिशकालीन आहे. भारतावर जेव्हा ब्रिटिशांचे साम्राज्य होते तेव्हा 1858 मध्ये अशा पद्धतीची व्यवस्था सुरू करण्यात आली. त्यावेळी भारतात पहिली मॅट्रिक परीक्षा घेण्यात आली होती व यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान 65 टक्के गुण आवश्यक करण्यात आले होते.

परंतु नंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी यामध्ये सुधारणा केली व भारतीय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान 33% गुणांची मर्यादा निश्चित केली. जर आपण या मागील कारण पाहिले तर असे स्पष्ट होते की भारतीय विद्यार्थ्यांची जी काही शैक्षणिक पातळी होती ती ब्रिटिश विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहे.

त्यामुळे 65 टक्क्यांवरून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी किमान उत्तीर्ण श्रेणी 33% केली. या दृष्टिकोनातून बघितले तर आजही आपल्याला उत्तीर्ण होण्यासाठी 33% गुणच मिळणे आवश्यक आहे तो त्या कालच्या ब्रिटिश शिक्षण पद्धतीचा एक भाग आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe