Supreme Court Decision: ‘स्त्रीधन’ ही पूर्णतः पत्नीची मालमत्ता, त्यावर पतीचा कुठलाही प्रकारचा नसणारा अधिकार! सुप्रीम कोर्टने दिला महत्वपूर्ण निर्णय

Supreme Court Decision:- दररोज कोर्टांमध्ये विविध प्रकारचे प्रकरणे दाखल होत असतात व त्यावर सुनावणी सुरू असते. अशाच प्रकारचे प्रकरणे सर्वांच्च न्यायालय देखील सुरू असतात व अशा पद्धतीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम असतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण असे निकाल दिलेले आहेत.

अगदी त्याच पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे व त्या निकालात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘स्त्रीधना’वर संबंधित स्त्रीच्या पतीचा कोणत्याही प्रकारे अधिकार किंवा नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे नेमके हे प्रकरण काय होते? सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला आहे हे तपशीलवार पाहू.

सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वपूर्ण निकाल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वपूर्ण निकाल दिला असून त्यामध्ये म्हटले की,स्त्रीधनावर संबंधित स्त्रीच्या पतीचे कोणत्याही प्रकारे नियंत्रण राहणार नाही. संकट काळामध्ये तो त्या धनाचा वापर करू शकेल. परंतु नंतर मात्र त्याला ते परत करावे लागेल. यामध्ये खंडपीठाने म्हटले की, स्त्रीला तिच्या स्त्रीधनावर पूर्णपणे अधिकार आहे.

एखाद्या स्त्रीला लग्नाच्या अगोदर, लग्नाच्या दरम्यान किंवा नंतर आई-वडील, सासर, नातेवाईक आणि मित्रांकडून काही भेटवस्तू मिळाले तर त्याला स्त्रीधन म्हटले जाते. अशा प्रकारे मिळालेल्या भेटवस्तू या पूर्णपणे स्त्रीची मालमत्ता आहे व तिला तिच्या इच्छेनुसार ते विकण्याचा किंवा ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे.

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर बुधवारी एका महिलेच्या याचे केवळ सुनावणी झाली व यामध्ये खंडपीठाने म्हटले की, स्त्रीधनाचा जर अप्रमाणिकपणे गैरवापर झाला तर तिचा पती किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर आयपीसीच्या कलम 406 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.

अशा प्रकरणांमध्ये फौजदारी खटल्याप्रमाणे ठोस पुराव्याच्या आधारे निर्णय घेऊ नये, तर पत्नीचा दावा अधिक भक्कम असल्याच्या शक्यतेच्या आधारे निर्णय घ्यावा असे देखील न्यायालयाने म्हटले. यामध्ये घटनेचे कलम 142 नुसार आपल्या अधिकाराचा वापर करून खंडपीठ आणि पत्नीचे सर्व दागिने हिसकावून घेतल्याबद्दल पतीला 25 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश या प्रकरणात दिले.

काय होते नेमके हे प्रकरण?
या प्रकरणात याचिकाकर्त्या महिलेचा आरोप आहे की, 2003 मध्ये लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री तिला भेट म्हणून मिळालेले सोन्याचे दागिने आणि वडिलांकडून मिळालेला दोन लाख रुपयांचा चेक पतीने स्वतःकडे घेतला व नंतर आपल्या आई सोबत मिळून त्याने कर्ज फेडण्यासाठी त्या पैशांचा वापर केला. 2009 मध्ये कौटुंबिक न्यायालयाने तिच्या बाजूने निकाल दिला. तिच्या पतीला 8.9 लाख रुपये देण्याचे आदेश दिले. परंतु, केरळ उच्च न्यायालयाने हा आदेश बाजूला ठेवला आणि सांगितले की, पतीने ‘स्त्रीधन’ घेतल्याचे सिद्ध करण्यात पत्नी अपयशी ठरली आहे. त्यानंतर यावर सुप्रीम कोर्टाने सदर निकाल दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe