अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- कोरोना झाला त्यानंतर अतिवृष्टी देखील झाली. या सर्व संकटाना मात देत शेतकऱ्यांनी पीक घेतले. मात्र आता या मालावर चोरट्यांची नजर पडलेली दिसून येऊ लागली आहे.
नगर जिल्ह्यात चोरट्यांकडून शेतकऱ्यांचा सोयाबीन लंपास केले जात असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

पहिली घटना…
राहाता तालुक्यातील आडगाव ब्रुद्रुक येथील बेदं वस्तीवरील दोन शेतकऱ्यांची पंधरा क्वीटंल खळ्यावरील सोयाबीन चोरटयांनी चोरून नेली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भिती पसरली आहे.यामध्ये आडगाव ब्रु येथील बेंद वस्तीवरील भिमराज जगन्नाथ शेळके यांची तीन क्वी.व बाळासाहेब रामचंद्र शेळके यांची बारा क्वी.सोयाबीन चोरटयांनी चोरून नेली.
लोणी-आडगाव रोडच्या कडेला असणाऱ्या वस्ती वरील घराशेजारी असणाऱ्या खळ्यावर दोघांनीही सोयाबीन वाळायला टाकली होती. संध्याकाळी बारदाण्याखाली झाकुन ठेवलेली सोयाबीन चोरटयांनी गोण्यामध्ये भरून नेली. चालु बाजार भावानुसार दोघांचे मिळुन पाऊन लाखाची चोरी झाली आहे.
दुसरी घटना…
श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे हद्दीत पहिल्या दिवशी भोकर शिवारातून दंडवते यांचे शेतातील सेडमधून ६५ हजार रूपये, दुसऱ्या दिवशी खोकर गावालगत हमरस्त्यावर खलाटे यांच्या सेडमधून ४८हजार रूपये किमतीच्या सोयाबीन तसेच तिसऱ्या दिवशी वडाळा महादेव बसस्टँडच्या पुर्वेस हायवे लगतच्या
पेमराज पनालाल कोठारी फर्मचे मोहीत संजय कोठारी यांच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर सेडमधून ९ ते १० लाख रूपये (अंदाजे) किंमतीचे सोयाबीन कट्टे ट्रक लावून चोरट्यांनी चोरून नेली. पोलीसांचा धाक न राहील्याने राजरोसपणे चोर चारचाकी वाहनातून चोऱ्या करत असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













