Sarkari Naukri 2021 : सरकारी नोकरी पाहिजे ? तयारीला लागा.. तब्बल 666 पदांसाठी

Ahilyanagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध परीक्षांच्या जाहिराती जाहीर केल्या जात आहेत.

एमपीएससीनं आज महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची 666 पदांची जाहिरात जारी केली आहे.

याद्वारे पोलीस उपनिरिक्षक 376, राज्य कर निरीक्षक 190 आणि सहायक कक्ष अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबवन्यात येणार आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येनार आहे.

ह्या आहेत सर्व जागा

सामान्य प्रशासन विभागाकडील सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 100 जागांवर, तर वित्त विभागाच्या राज्य कर निरीक्षक पदाची 190 आणि गृह विभागाच्या 376 पदांसाठी पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल.

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 29 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर आहे.

असे आहे परीक्षा शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं भरता येईल.

काय आहे पात्रता ?

या पदांसाठी उमेदवार पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पुरुष उमेदवाराची उंची 165 सेमी तर महिला उमेदवारची उंची 157 सेमी असणं आवश्यक आहे. तर पुरुष उमेदवारांना किमान 5 सेमी छाती फुगवता आली पाहिजे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe