नगर – वैद्यकीय खर्चाचे बिल मंजूर करण्यासाठी १३ हजारांची लाच मागणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास अटक करण्यात आली. राजेंद्र सुधाकर नेहूलकर असे त्याचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. तक्रारदाराच्या मुलाचे वैद्यकीय खर्चाचे बिल मंजूर करण्यासाठी त्याने दहा टक्क्यांप्रमाणे १३०० रुपयांची लाच मागितली होती.
तडजोडीनंतर १२०० रुपये स्वीकारताना लाचलुचपतच्या पथकाने ही कारवाई केली. नेहुलकर याच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपतचे पोलिस अधीक्षक हरिष खेडकर, निरीक्षक श्याम पवरे, दीपक करांडे, पोलिस नाईक प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय गंगुल, रवींद्र निमसे, हारून शेख, राधा खेमनर, वैभव पांढरे आदींनी ही कारवाई केली. लोकसेवक लाच मागत असतील, तर १०६४ या क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन खेडकर यांनी केले आहे.