नगरसेविका सारिका भुतकर यांचे नगरसेवक पद रद्द !

Ahmednagarlive24
Published:

 

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या प्रभाग सहा अ मधील विद्यमान नगरसेविका सारिका हनुमंत भुतकर यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे.
अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गातून त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यांची ही दुसरी टर्म होती. मागील महापालिकेत त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या.अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्यांनी सादर केले होते. मात्र जातपडताळणी समितीने हे प्रमाणपत्र रद्दबातल ठरविले. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे.
अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांनी दिली.
महापालिकेत शिवसेनेचे 24 नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी भूतकर यांचे पद रद्द झाल्याने आता ही संख्या 23 वर आली आहे.
त्यामुळे या आता जागेवर पोटनिवडणूक होणार असून तसे आदेश जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment