ज्ञानसागर कोचिंग क्लासेसच्या खोल्यांना या एका कारणामुळे ठोकले सील

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- महापालिकेच्या बुरुडगाव प्रभाग कार्यालयाने मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी टिळक रस्त्यावरील ज्ञानसागर कोचिंग क्लासेसच्या पाच खोल्यांना सील ठोकत जप्तीची कारवाई प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी यांनी केली.

टिळक रस्त्यावरील ज्ञानसागर कोचिंग क्लासेसकडे मनपाची मिळकतीवरील मालमत्ताकराची आज अखेर थकबाकी १५ लाख ३७ हजार ४६९ रुपये एवढी आहे.

महापालिकेच्या वतीने संबंधितांना वेळोवेळी थकबाकी भरण्याबाबत कळविले होते. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करत थबाकी भरण्यास नकार दिला.

त्यामुळे नानासाहेब गोसावी यांच्या पथकाने आज रोजी मालमत्तेच्या ५ खोल्यांना सील ठोकले. या कारवाई एस.एस. पुंडकर, व्ही.जी. जोशी, राजेंद्र म्हस्के, विजय चौरे यांच्या पथकाने केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment