भक्ष्याच्या शोधात असलेली २ वर्षाची बिबट्या मादी सोमवारी पहाटे विहिरीत पडली. ही घटना गुंजाळवाडी येथील कॉलेज रोडच्या संपत काशिनाथ गुंजाळ यांच्या विहिरीत घडली. विहिरीत पाणी असल्याने बिबट्याने मोटार ठेवण्याच्या स्टॅण्डचा सहारा घेतला.
दुपारी सव्वा दाेन वाजता संपत गुंजाळ विहिरीची मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीतून बिबट्याचा आवाज आला. उपसरपंच अमोल संभाजी गुंजाळ यांनी ही माहिती वन विभागाला कळविली.
उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील यांनी वन क्षेत्रपाल एस. एस. माळी, वनपाल डी. व्ही, जाधव, वनरक्षक एस. एम. पारधी, वाहन चालक आर. आर. पडवळे, वनमजूर संतोष बोऱ्हाडे,
संपत मंडलिक आदींचे पथक पिंजऱ्यासह घटनास्थळी पाठवले. नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली. तासाभरात बिबट्याला वनविभागाने पिंजरा विहिरीत सोडून बाहेर काढले. सोमवारी रात्री बिबट्याला जंगलात सोडून देण्यात आले.