Apple चा पहिला कम्प्यूटर विकला गेला ह्या किंमतीत ! आकडा एकूण बसेल धक्का…

Ahmednagarlive24
Published:

Apple चा सर्वात पहिला कम्प्यूटर Apple-1 ला नुकतेच लिलावात ठेवण्यात आले होते. यात हा कम्प्यूटर ४ लाख डॉलर म्हणजेच २.९७ कोटी रुपयात विकला गेला आहे.

या कम्प्यूटरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याला कंपनीचे फाउंडर Steve Jobs आणि Steve Wozniak ने आपल्या हाताने बनवले होते. ४५ वर्ष जुन्या या कम्प्यूटरला दोन्ही फाउंडरने स्वतः डिजाइन केले होते.

तसेच स्वतः याची टेस्टिंग सुद्धा केली होती. या प्रोजेक्ट मध्ये जॉब्स आणि वोजनिकएक यांनी मदतीसाठी आणखी दोन लोकांची मदत घेतली होती.

या कम्प्यूटरला Chaffey College Apple-1 कंप्यूटर च्या नावाने ओळखले जात होते. कारण, याचे खरे मालक Chaffey College हे प्राध्यापक होते.

त्यांनी १९७७ मध्ये Apple-II कम्प्यूटर खरेदी करण्यासाठी अॅपल १ ला आपल्या एका विद्यार्थ्याला विकले होते. त्यावेळी त्या विद्यार्थ्याने या कम्प्यूटरसाठी प्राध्यापकाला फक्त ६५० डॉलर देण्यात आले होते.

अॅपल १ सध्या जगातील ६० यूनिट्सपैकी एक आहे. हा त्या २० अॅपल १ कंम्प्यूटर्समध्ये समावेश आहे. जो सध्या काम करीत आहे. अॅपल १ केसेजच्या मदरबोर्ड सोबत येतो.

तसेच याच्या कीबोर्ड्स व मॉनिटर्सला वेगळ्या पद्धतीने सेल केले जात होते. कंम्प्यूटर हवाईच्या खास koa wood कॅबिनेट सोबत येत होते. अॅपलने या वूड केसिंगसोबत फक्त २०० कंप्यूटर्सला तयार केले होते.

जॉब्स आणि वॉजनिएक जास्तीत जास्त अॅपल १ कम्प्यूटर्सला कंपोनेंट्स पार्ट्स म्हणून विक्री करीत होते. एक कम्प्यूटर शॉपने याच्या ५० यूनिट्सची डिलिव्हरी घेतली होती. त्यातील काही वूड केसिंग मध्ये डिझाइन करण्यात आली होती. ज्याला यूजर्सने खूप पसंत केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe