Food tips in Marathi : ‘हे’ पदार्थ खावू नका भोगावे लागतील भयंकर परिणाम

Ahmednagarlive24
Published:

काही पदार्थ हे जन्मतःच हानिकारक असतात. तर काही पदार्थ असे असतात जे एकटे खाल्ले तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात पण जेव्हा ते दुस-या एखाद्या अन्नपदार्थासोबत खाल्ले जातात तेव्हा ते फायद्याऐवजी आरेग्याचं नुकसानच जास्त करतात.

याला विरुद्ध आहार असे म्हणतात. जसे की मासे आणि दूध, फळे आणि दूध, शुद्ध मध आणि तूप या दोन फायदेशीर गोष्टी एकत्र मिसळून चुकीच्या वेळी खाल्ल्यास त्याचा आपल्या शरीरावर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते दूध, दही आणि ताकासोबत केळी खाऊ नयेत. कारण या दोघांच्या मिश्रणामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते आणि शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. या पदार्थांसह केळीचे सेवन केल्याने सर्दी, खोकला आणि ऍलर्जी सुद्धा होऊ शकते.

तूप आणि मध समान प्रमाणात मिक्स करून खाऊ नका. कारण याचा शरीरात उलट प्रतिक्रिया बनते. वास्तविक मधामध्ये गरम करणे, कोरडे करणे आणि बरे करणे हे गुणधर्म असतात तर तूप थंड आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्मांनी परिपूर्ण असते.

तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की तूप आणि मध एकत्र खाताना दोन्ही गोष्टी समान प्रमाणात मिसळण्याऐवजी एका पदार्थाचे प्रमाण जास्त घ्या आणि दुस-याचे कमी मिसळा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe