अहमदनगर – कोरोनामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. यातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं आता राज्यातील शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.
मात्र यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. ती म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रवेश शुल्कात व परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमीक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8वी) या परीक्षेच्या प्रवेश शुल्कात व परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे.
आवेदनपत्रे भरणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची छपाई, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, निकाल जाहीर करणे, गुणवत्ता याद्या तयार करणे या कामकाजासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे शुल्कात वाढ करण्यात आली.
नेमकी किती फी वाढ झाली आहे? जाणून घ्या सविस्तर
प्रवेश शुल्क : बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी 20 रुपयांऐवजी 50 रुपये
प्रवेश शुल्क : मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 20 रुपयांऐवजी 50 रुपये
प्रवेश शुल्क : बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी 60 रुपयांऐवजी 150 रुपये
प्रवेश शुल्क : मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 00 रुपयांऐवजी 75 रुपये