पारनेर : विज्ञान – गणित प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सर्वांगीण विकास होऊन बुद्धीमतेला चालना मिळते, त्यांची वैचारिक शक्तीप्रगल्भ बनून नवीन शिक्षण विकसित होते, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
कान्हूर पठार (ता.पारनेर) येथे जनता विद्या मंदिर विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय, पंचायत समिती (शिक्षण विभाग) व विज्ञान -गणित आध्यापक संघटना पारनेर यांच्या विद्यमाने आयोज़ित विज्ञान -गणित पर्यावरण व लोकसंख्या शिक्षण प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आ. लंके बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी आमदार दादाभाऊ कळमकर होते. याप्रसंगी गटविकास अधिकारी किशोर माने, माजी सभापती सुदाम पवार, रयत संस्था सल्लागार समितीचे सदस्य ज्ञानदेव पांडुळे, शिक्षक नेत्ंो रा. या. औटी गोकुळ कळमकर, विजय काकडे,
प्रवीण ठुबे, शिक्षण विस्तार अधिकारी संभाजी झावरे, जि.प. शाळेचे मुख्या. गोवर्धन ठुबे, सैनिक बँकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे, चंद्रभान ठुबे, कैलास लोंढे, जिल्हा शिक्षक नेते, पारनेर तालुका गणित- विज्ञान आध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रवीणचंद्र गुंजाळ, सचिव सोपान गवते, समन्वयक चंद्रकांत शिंदे, केंद्रप्रमुख दिलीप व्यवहारे, प्राच्यार्य बाबासाहेब वमने, एस.पी. ठुबे, डी. सी. व्यवहारे, बबन गुमटकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी आ.लंके पुढे म्हणाले, या प्रदर्शनात विधार्थांनी सादर केलेली उपकरणे दखल घेण्याजोगी आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांपेक्षा मराठी शाळांत दुर्जेदार शिक्षण मिळते. शिक्षकांनाही विविध उपकरणे सादर केल्याचे समाधान वाटते.
या पुढील जिल्हास्तरीय विज्ञान- गणित प्रदर्शन पारनेर तालुक्यात भरविले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी मा. आ. कळमकर म्हणाले, जगाबरोबर स्पर्धा करण्यासाठी गणित- विज्ञान, या विषयांचा अभ्यास महत्त्वाचा आहे.
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश सहज संपादन करता येते. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यानी केले. शिक्षक नेते रा.या. औटी यांनी आभार मानले.