उड्डाण पुलाच्या जागेसाठी भूसंपादन करण्यास संरक्षण मंत्र्याचा हिरवा कंदील!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : शहरातील उड्डाण पुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रीया तातडीने सुरू करण्यास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी हिरवा कंदील दिला असून, येत्या दोन आठवड्यात ही सर्व प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश अधिकार्याना दिले असल्याची माहीती खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशना दरम्यान खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातील उड्डाण पूलाच्या व अन्य राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून नगर शहराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाकडे लक्ष वेधले होते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची वैयक्ति भेट घेवून खा.डाॅ विखे यांनी नगर शहरातील उड्डाण पुलासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जमीनच्या भूसंपादनाचा प्रश्न सोडवावा आशी विनंती केली होती.

बुधवारी रक्षा भवन येथे शहरातील उड्डाण पुला बरोबरच नगर बाह्यवळण रस्ता आणि नगर करमाळा सोलापूर या मार्गाचा प्रश्न प्रामुख्याने चर्चिला गेला.या तिन्ही मार्गाचे काम सरंक्षण विभागाच्या जमीनीच्या भूसंपादना अभावी रखडल्याचे खा.डाॅ.सुजय विखे यांनी निदर्शनास आणून दिले.

संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या संरक्षण विभागाच्या तसेच जमीन भूसंपादनाच्या विषयाशी संबधित असलेल्या अधिकार्याकडून माहीती जाणून घेतल्यानंतर या सर्व जमीनीच्या भूसंपादन विषयास मंजूरी दिली याची कार्यवाही दोन आठवड्यातच पूर्ण करण्याचे मंत्र्यानी सूचित केले असलूयाचे खा.डाॅ.विखे यांनी सांगितले.

जनतेच्या वतीने मानले आभार!

जमीन भूसंपादनाच्या कारणामुळे गेली अनेक वर्षे नगर शहरातील उड्डाण पुलाचे काम रखडले होते.सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामातील अडथळा दूर झाला असून यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे खा.डाॅ.विखे नगरच्या जनतेच्या वतीने आभार मानले!

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment