आमदार निलेश लंके यांनी लोकसभचे स्वप्न पाहू नये, ‘या’ जेष्ठ नेत्याने दिला सल्ला

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :-  राज्यात कोरोना रुग्णांसाठी बेडची संख्या कमी पडत असताना आमदार निलेश लंके यांनी पुढे येत कोविड सेंटरची उभारणी केली.

पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी भावळणी इथं तब्बल 1 हजार 100 बेडचं कोविड सेंटर सुरु केलं. आमदार नीलेश लंके तुम्ही आर. आर. पाटलासारखे महाराष्ट्रात काम करा.

त्यांच्यासारखे व्हा, परंतु आपले अंथरूण, पांघरूण सांभाळा, असा वडिलकीचा सल्ला देत ज्येष्ठ नेते माजी आ. नंदकुमार झावरे यांनी आ. लंके यांना लोकसभा निवडणूक न लढविण्याचे सांगितले.

आ. लंके यांना लोकसभेसाठी प्रोजेक्ट करण्याचे एकीकडे राष्ट्रवादीचे प्रयत्न असतानाच दुसरीकडे लंके यांना पारनेरमध्ये साथ देणारे ज्येष्ठ नेते झावरे यांनी वेगळ्या शब्दात कान फुंकल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर महाविद्यालयाच्या 20 लाख रुपये खर्चाच्या रस्ता कामाचा प्रारंभ आ. लंके व माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आला. ज्येष्ठ नेते माजी आ. नंदकुमार झावरे म्हणाले, पारनेर विधानसभा मतदारसंघात आ. लंके यांचे चांगले काम आहे.

त्यामुळे आ. लंके यांनी वरच्या लोकसभा निवडणुकीचा विचार करू नये. तालुक्यातील जनतेला व प्रश्नांना जर न्याय द्यायचा असेल तर तालुक्यातच काम करा. पारनेर तालुक्यातून मोठे राजकीय भवितव्य आहे. आर. आर. पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून काम केले पाहिजे.

आ. लंके यांचे कोरोना काळातील आदर्श काम महाराष्ट्र्रसह जगाने पाहिले आहे. माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा रस्ता भेट द्यायचा होता.

शून्यातून विश्व निर्माण करणारे हे नेतृत्व आहे. विधानसभा निवडणुकीत बोलवून एक सामान्य कुटुंबातील सदस्य असताना मदत केली आहे.

जिल्हा मराठा शिक्षण संस्थेमध्ये गोरगरीब मुलांना शिक्षण व अधिकारी बनविण्याचे काम केले आहे. शिक्षण संस्थेसाठी सर्वातोपरी मदत करण्यास तयार आहे, तुम्ही हक्काने सांगा, असे आमदार लंके म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe