अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- नगर जिल्ह्यातील गाजलेलं रेखा जरे हत्याकांड प्रकरणी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे
यांच्या हत्याकांड प्रकरणात मुख्य आरोपी असलेला बाळ बोठे याच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने येत्या 2 डिसेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बोठेच्या वतीने मागील महिन्यात जामीनासाठी अर्ज दाखल आहे, मात्र दिलेल्या तारखेला वकील यांनी तब्येतीच्या कारणास्तव अर्ज दिला होता.
त्यानंतर न्यायालयाने जामीना बाबतच्या सुनावणी साठी 2 डिसेंबर हि तारीख दिली होती. जिल्हा न्यायालयात जामीन न मिळाल्याने बाळ बोठेच्या वतीने वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत
जामीना साठी प्रयत्न सुरू केले आहे. आता 2 डिसेंबर ला होणाऱ्या सुनावणीत बाळ बोठेला जामीन मिळतो का याची उत्सुकता नगर जिल्ह्याला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम