अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- बाथरूमसाठी घरातून बाहेर गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे घडलीय.
या घटने बाबत मुलीच्या काकांनी राहुरी पोलिसांत अपहरणचा गुन्हा दाखल केलाय. राहुरी तालूक्यातील ब्राम्हणी येथे सदर १४ वर्षे १० महिने वय असलेली मुलगी तिचे आई वडीलां सोबत राहत आहे. दिनांक १६ नोव्हेंबर रोजी रात्री सदर मुलगी व तिच्या घरातील इतर लोकांनी नेहमी प्रमाणे जेवण केले.
त्यानंतर सदर मुलगी तिच्या आजी सोबत झोपी गेली. दिनांक १७ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार वाजे दरम्यान सदर मुलगी बाथरूम ला जावून येते. असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र ती परत आली नाही. सदर मुलीच्या नातेवाईकांनी परिसरात तीचा शोध घेतला. मात्र ती कोठेही मिळून आली नाही.
अखेर त्यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या घटने बाबत मुलीच्या काकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरोधात मुलीचे अपहरण करून नेल्याचा गुन्हा दाखल केलाय. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
घटनेला सहा दिवस उलटून गेले. राहुरी पोलिसांकडून अद्याप कोणताही तपास लागला नाही. मुलीचा शोध घेण्यासाठी तूम्ही पोलिस पथकाला गाडी करून द्या. असे पोलिस अधिकाऱ्यांकडून मुलीच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. मुलीच्या नातेवाईकांनी आरपीआय चे तालूकाध्यक्ष विलासनाना साळवे.
यांची भेट घेऊन मदतीसाठी पूढे येण्यास सांगितले. राहुरी तालूक्यातील कानडगाव तसेच ब्राम्हणी या दोन ठिकाणाहून अल्पवयीन मुलींचे अपहरण करून पळवून नेल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. कानडगाव येथील मुली बाबत दोन दिवसांपूर्वी उपोषण करण्यात आले होते.
मात्र अद्याप दोन्ही मुलींचा तपास लागला नाही. विलासनाना साळवे यांनी दोन्ही मुलींच्या नातेवाईकांना घेऊन पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांची भेट घेऊन मुलींचा शोध लावण्या संदर्भात चर्चा केली.
यावेळी आरपीआय चे तालूका उपाध्यक्ष सुनिल चांदणे, छाया दूशिंग, स्नेहल सांगळे, वंचितचे जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने, शहराध्यक्ष पिंटूनाना साळवे, संतोष दाभाडे आदि उपस्थीत होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम