ऑनलाईन मटक्याचा सुळसुळाट

Ahmednagarlive24
Published:

भंडारदरा :- पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भंडारदरा धरणाच्या परिसरात ऑनलाईन मटक्याचा सुळसुळाट झाला आहे. या मटक्याच्या मोहामध्ये तरुणाई अडकली आहे. भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये सध्या मोबाइल मटक्याचा जोरदार बाजार सुरु आहे.

मोबाइलवरच तीन सट्टेबाजारांचे गेम मेसेजद्वारे अज्ञात व्यक्ती पोलिसांची नजर चुकवून घेत आहेत. विशेष म्हणजे मोबाइलवर समोरील सट्टेबाजाला ज्या बाजाराचे गेम आहेत, त्याचे मेसेज टाकून सट्टा घेतला जातो. कधी कधी या मटक्यासाठी व्हॉट्सॲपचाही वापर करत असल्याची माहिती एका मटका खेळणाऱ्या व्यक्तीकडून देण्यात आली आहे.

सट्टेबाजाराचा निकाल आल्यानंतर पैशांची देवाण-घेवाण होत असून अनेक तरूण तसेच व्यापारी या सट्टेबाजाराकडे आकर्षित होत आहेत. बाहेरगावातील हा मोबाइल मटका चालविणारा चालक असून भंडारदरा परिसरातीलच एक व्यक्ती हा मटका घेत आहे.

सदर मटक्याच्या बाजाराचे ओपन आणि क्लोज अशा पद्धतीचे बाजार घेतले जात आहे. निकालानंतर ताबडतोब पैशांची मोठी देवाण – घेवाणही होत आहे. भंडारदरा परिसरातील बाजारतळाजवळील एका मार्केटमध्ये हा मटका घेतला जात असुन कायमच मटका खेळणाऱ्यांची गर्दी या परिसरात होत असते. या मटकेबहाद्दरांवर तात्काळ कारवाई करण्यात येऊन सायबर गुन्हे अंतर्गत यांचे मोबाइल जप्त करण्यात यावे व गुन्हा दाखल करण्यात यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment