बीड: स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे परळीत गुरुवारी मेळावा घेण्यात आला. यात पंकजा मुंडेंसह नाराज नेत्यांची भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे टीका केली.
पक्षात लोकशाही उरली नसल्याचे सांगत पंकजांनी भाजपच्या कोअर कमेटीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात पंकजांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
त्यांतील अप्रत्यक्षपणे बहुतांश टीका ही फडणवीस यांच्यावरच होती. दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही थेट फडणवीसांवर टीका केली.
मी ज्याला मोठे केले त्याने माझ्याशी असे वागायला नको होते, असे ते म्हणाले. कुणी पक्ष सोडून जा म्हणत असेल तर त्याला तुम्हीच पक्ष सोडा, असे रोखठोक उत्तर देण्याचा सल्ला चक्क भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच दिला.
पंकजा मुंढे बोलताना म्हणाल्या ‘गोपीनाथरावांची आठवण आली की रडावं वाटतं… पक्षात अनेकांचा जीव गुदमरत आहे. ज्यांनी पक्षाला मोठं करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, त्यांंना चुकीची वागणूक दिली जातेय.
जिथे गोपिनाथ तिथे एकनाथ, असे म्हटले जायचे. गोपीनाथ मुंडेची आठवण आली की रडावं वाटतं, असे सांगतानाच खडसे यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली. मला विचारून फडणवीसांना पक्षाध्यक्ष करण्यात आले होते.
आता त्यांनी माझ्याशी असे वागायला नको होते. माझ्याकडे बोलण्यासारखे खूप काही आहे, परंतु, आता वेळ नाही. योग्य वेळी मी सगळे बोलेन, असा इशारा त्यांनी दिला. मंत्री असताना गोपीनाथ मुंडेंच्या औरंगाबादेतील स्मारकासाठी दिलेल्या जागेत वीटही उभी करता आली नाही.
परंतु, गुपचूप शपथविधीच्या नंतर २५ नोव्हेंबर रोजी कार्यारंभ आदेश दिले गेले. मला हे माहिती नव्हते मी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो, त्यांना विषय सांगताच त्यांनी लागेल तितका निधी देऊ, असे सांगितल्याचे खडसे म्हणाले. ‘गोपीनाथ मुंडेंनी मुठभरांचा असलेला पक्ष जनसामान्यांचा केला आता पुन्हा जनसामान्यांचा हा पक्ष मुठभरांचा करण्याचा प्रयत्न होत आहे.
मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, पदाने कुणी मोठं होत नाही. पक्ष कुणाच्याही मालकीचा नसतो. मी पक्ष सोडणार असल्याचे पसरवले जातेय. पण मी पक्ष सोडणार नाही. हा पक्ष माझ्या बापाचा आहे.
पक्षाला मला सोडायचे असेल तर निर्णय घ्यावा. मला जुना पक्ष हवा असून आजच्या परिस्थितीत पक्षानेच मुळ गाभा लक्षात घेऊन आत्मचिंतन करावे’ असे पंकजा म्हणाल्या.’