अहमदनगर ब्रेकींग: जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेले आणखी १२ प्रवासी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :-  यापूर्वीही अहमदनगर जिल्ह्यात १५ प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले हाेते. आता आणखी १२ आंतरराष्ट्रीय प्रवाशी आले असल्याची माहिती समाेर आली आहे. कराेनाच्या नवा ओमायक्राॅन व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढवली आहे.

या पार्श्वभूमीवर देशात काळजी घेतली जात आहे. केंद्र व राज्य सरकार अलर्ट झाले असून, स्थानिक जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात २८ नाेव्हेंबरनंतर आलेल्या १२ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची माहिती समाेर आली आहे. हे प्रवासी अतिजाेखमीच्या दक्षिण आफ्रिका आणि नेदरलॅण्डमधून आल्याने नगरकरांची चिंता वाढली आहे.

यात अहमदनगर शहरातील पाच जणांचा समावेश आहे. या १२ प्रवाशांचा शाेध घेतला जात आहे. त्यात अहमदनगर शहरातील पाच, अकाेले तालुक्यातील चार,

काेपरगावमधील दाेन आणि राहाता तालुक्यातील एक प्रवाशाचा समावेश आहे. या प्रवाशांचा शाेध घेऊन त्यांची कराेना चाचणी करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe