विवाहितेचा छळ करून घराबाहेर हाकलले !

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव : ‘तू आम्हाला आवडत नाहीस, तू आम्हाला नको आहे, मला दुसरे लग्न करायचे आहे’, असे म्हणून विवाहितेचा छळ करून तिला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून तिला घराबाहेर काढून दिल्याच्या प्रकरणात पती व सासरा यांच्याविरोधात कोपरगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंजिरी शार्दुल देव (वय ३०, रा. श्रीराम मंदिराच्या पाठीमागे) हिने आपण सासरी नांदत असताना लग्न झाल्यापासून ते दि. १२ डिसेंबर २०१९ रोजीपर्यंत तिचा छळ करून तिला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून घराबाहेर काढून दिले,

अशी फिर्याद नवरा शार्दुल शामप्रसाद देव व सासरा शामप्रसाद विश्वनाथ देव (रा. श्रीराम मंदिराच्या पाठीमागे, विवेकांनदनगर, कोपरगाव) यांच्या नावे कोपरगाव शहर पोलिसांत दिली आहे.

सदर मजकुराच्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe