अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2021 :- महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूनं धडक दिलीय. मुंबई, पुणे, पिंपरीत मिळून 8 रुग्ण सापडले आहेत.
यात पुणे-पिंपरीमध्ये सात रुग्ण आढळले आहेत तर नायजेरियातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या तिघांसह त्यांच्या संपर्कातील तिघे आणि फिनलंडहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाचा समावेश आहे.
अजून काहींच्या टेस्टचे रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यामुळेच रुग्णांचा आकडा वाढू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा कठोर नियम लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या संदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. मुंबईत चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनातील सर्वांचं यावर बारकाईनं लक्ष आहे.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये बाहेरचे जे रुग्ण येतात त्यासंबंधी केंद्र सरकारनेही कडक भूमिका घेतली पाहिजे. जिथे जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत तिथे नियमांचं पालन अतिशय काटेकोरपणे होतं की नाही हेदेखील पाहिलं पाहिजे”.
“कारण, मागे आपण बघितलं, दोन वर्षापुर्वी मार्च महिन्यात एक कपल दुबईहून आलं, त्याची लागण एका ड्रायव्हरला झाली आणि तिथून कोरोना फोफावला.
आताही इतर राज्यात एखाद दुसऱ्याला झालेलं पहायला मिळत होतं पण आधी कुटुंबाला आणि नंतर इतरांनाही त्याची लागण झाली. सगळे जण सांगतात, मास्क वापरा,
काही जण म्हणतात ओमिक्रॉनची तीव्रता कमी आहे. त्यामुळे एकदा देशपातळीवरच WHO ने त्याबाबत क्लिअर केलं पाहिजे.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम