पुणे : पिंपरी-चिंचवड पाेलिस आयुक्तालय हद्दीतील दापाेडी येथे एका कुटुंबातील १४ वर्षीय मुलीचा गळा दाबून सावत्र बापाने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मुलीवर बापाने लैंगिक अत्याचार केला आहे का, याचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर ते स्पष्ट हाेईल, अशी माहिती भाेसरी पाेलिसांनी दिली.
विजय बबन चव्हाण (४४, रा. दापाेडी) असे आराेपीचे नाव आहे.