परदेशातून जिल्ह्यात आलेल्या 15 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 65 अहवालाची प्रतिक्षा

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-  जगात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंतने धुमाकूळ घातला आहे. यातच या नव्या व्हेरियंटचा भारतात शिरकाव देखील झाला आहे. तसेच यामुळे प्रशासन देखील अलर्ट झाले आहे.

नुकतेच ऑमिक्रॉनच्या शोध मोहिमेत नगर जिल्ह्यात मंगळवार (दि.7) रोजी आणखी 55 व्यक्तींनी आंतरराष्ट्रीय प्रवास केल्याचे समोर आले आहे. यामुळे आता जिल्हा प्रशासन देखील यांचा शोध घेऊ लागले आहे.

नुकतेच या प्रवाश्यांची यादी आरोग्य विभागाला प्राप्त झाली असून या सर्वांचा शोध घेऊन आता त्यांची करोनाची चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत 15 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 65 अहवालांची प्रतिक्षा आहे.

जिल्ह्यात 3 तारखेला 15, 5 तारखेला 12 आणि काल 55 जणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास करून जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. या सर्वांची यादी राज्य पातळीवरून जिल्हा परिषद आरोग्य विभागाला प्राप्त झालेली आहे.

यातील 25 जणांचा ठावठिकाणी लागला असून 55 जणांची शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाने 25 जणांचे नमुने घेतलेले असून यात 15 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.

तर 65 अहवालाची प्रतिक्षा असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. दरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe