का झाला माजी आमदार अनिल राठोड यांचा पराभव ? हे दोन नगरसेवक हिटलिस्टवर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- राज्यात आणि देशात युतीचे सरकार असूनही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार अनिल राठोड यांना पराभवास सामोरे जावे लागले.

तब्बल ११ हजार ११५ मतांनी आ.अनिल राठोड यांचा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पराभव केला,हा पराभव राठोड यांच्यासह शिवसैनिकांच्या चांगलाच जिव्हारी लागला.

केवळ भाजपच नव्हे, तर शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी पक्षविरोधी काम केल्याची चर्चा आहे.आणि यामुळे माजी आमदार अनिल राठोड यांना पराभूत व्हावे लागले. या संदर्भात शुक्रवारी झालेल्या बैठकीत यावरही चर्चा झडली.

माजी शहरप्रमुख संभाजी कदम आणि ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांची नावे घेऊन या बैठकीत तक्रारी करण्यात आल्याचे समजते.

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यामुळे विधानसभेतील पराभवानंतर शिवसेनेत आलेली मरगळ दूर करण्यासाठी ही बैठक होती, असे सांगण्यात येते. मात्र निवडणुकीत कोणी काय केले, यावरच बराचवेळ चर्चाही झाली.

या बैठकीपासून नगरसेवकांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते. लवकर नगरसेवकांचीही बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान  या बैठकीत माजी शहरप्रमुख संभाजी कदम, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांच्या नावाची चर्चा झाली असली,

तरी इतरही शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी विरोधात काम केल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे केवळ वरील दोघेच नव्हे, तर इतरही अनेक नगरसेवक संशयाच्या भोवर्‍यात आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment