Sun Pharma Fire :- नागापूर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनीला लागलेल्या आगीत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आलीय.
नागापूर एमआयडीसीत सन फार्मा ही कंपनी आहे. या कंपनीच्या आवारात वेगवेगळे प्लॅट असून आतील एका प्लाॅन्टला बुधवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान आग लागली होती.
यावेळी त्या ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांची ड्युटी होती. त्यातील एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Ahmednagar Breaking: Sun Pharma Company fires
अहमदनगर शहरातील एमआयडीसी येथील सन फार्मा या कंपनीला बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आग लागली. ही आग मोठी असल्याने यात मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.
आग विझविण्यासाठी एमआयडीसी, महापालिकेतील अग्निशमन बंबांनी शर्थीचे प्रयत्न केले.सन फार्मा या औषधांच्या कंपनीत तीन लिक्विडचे प्रकल्प आहेत.
याच प्रकल्पाशेजारील रुमला ही आग लागली असून ती कंपनीत पसरली आहे. त्यामुळे या आगीची तीव्रता मोठी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
आग विझविण्यासाठी पाच अग्निशमन बंब दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीमध्ये दोन रुग्णवाहिकाही दाखल झाल्या आहेत.