अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात आठवड्याभरात १२१ नागरिक आंतरराष्ट्रीय प्रवास करून परतलेले. ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्ह्याचा आढावा घेऊन जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढवावा अशी सूचना केली आहे.
मंगळवारी नगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय प्रवास करुन ५५ नागरिक जिल्ह्यात दाखल झाले. आठ दिवसात १२१ जण आंतरराष्ट्रीय प्रवास करून नगर जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. त्यापैकी २५ जणांचे कोरोना अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत.
दरम्यान मुख्य सचिवांची व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. त्यात त्यांनी नगर जिल्ह्यात लसीकरण याचा वेग वाढविण्याच्या सूचना केल्या, तसेच तिसरा लाटेच्या पूर्वतयारीची सूचना देखील त्यांनी दिली.
बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषण कुमार रामटेके उपस्थित होते. नगर जिल्ह्यात आतापर्यंत २७ लाख १७ हजार ३३३जणांना लस देण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम