अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- ओमिक्रॉनच्या देशातील वाढत्या रुग्णसंख्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कमर्शियल आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची वाहतूक आता ३१ जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली असली तरी मालवाहू आणि डीजीसीए मान्यताप्राप्त उड्डाणांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही आहे.
येत्या १५ डिसेंबरपासून सुरू होणारी आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा निलंबित करण्यात आल्याची घोषणा नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने केली होती.
पण आंतरराष्ट्रीय उड्डाणे किती काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत, हे जाहीर केले गेले नाही. १५ डिसेंबरपासून भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सामान्यपणे सुरू होतील, असा निर्णय गेल्या महिन्यात २६ नोव्हेंबरला नागरी उड्डाण मंत्रालयाने घेतला होता.
कोविड-19 च्या संसर्गामुळे भारतात येणारी आणि भारतातून जाणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे २३ मार्च २०२० पासून बंद आहेत.
गेल्या वर्षी जुलैपासून सुमारे २८ देशांसोबत एअर बबल करारांतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे सुरू आहेत. करोना व्हायरसचा नवीन प्रकार ओमिक्रॉनमुळे जगभरात एक नवीन भीती निर्माण झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम