राहुल गांधींनी त्या वक्तव्या प्रकरणी माफी मागावी

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बलात्काराच्या वाढत्या घटनांविषयी केलेल्या कथित वादग्रस्त विधानाचे शुक्रवारी संसदेत तीव्र पडसाद उमटले. भाजपाने या प्रकरणी राहुल यांच्या माफीची मागणी करत संसदेत काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

‘महिलांविषयी असे विधान करणाऱ्या राहुल यांना संसदेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही,’ अशी कडवट भूमिका भाजपाने यासंबंधी घेतली. दरम्यान, राहुल यांनी या प्रकरणी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा दावा करत भाजपावरच देशात हिंसाचार पसरवण्याचा आरोप केला.

राहुल गांधी यांनी गुरुवारी झारखंडमधील प्रचार सभेत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’चे ‘रेप इन इंडिया’त रूपांतर झाल्याची टीका केली होती.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाची घोषणा केली होती; पण सध्या देशात सर्वत्र रेप इन इंडियाच दिसत आहे,’असे ते म्हणाले होते.

त्यांच्या या विधानाप्रकरणी भाजपाने शुक्रवारी लोकसभेत रान उठवले. ‘राहुल यांच्या विधानामुळे संसदच नव्हे, तर अवघ्या देशाच्या भावना दुखावल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment